बुलडाण्याच्या आयडीअल क्लासेसचा नवोदयच्या निकालात डंका! तब्बल ८ विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र! विद्यार्थी म्हणतात वाघ सर आणि दंदाले सरांनी आम्हाला घडवलं..

 
ideal classes
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  २९ एप्रिल २०२३ ला झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल २१ जून २०२३ ला घोषित झाला. या निकालात पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे बुलडाणा शहरातील आयडीअल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तब्बल ८ विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरले असून आयडीअल क्लासेसच्या श्री वाघ व श्री दंदाले सरांनी आम्हाला घडवलं. त्यांनी करवून घेतलेल्या नियोजनबद्ध अभ्यासामुळेच हे यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. नवोदय शिवाय ६ विद्यार्थ्यांनी NMMS ही परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे.
 

२०१० पासून तर आजपर्यंतच्या प्रत्येक वर्षी आयडीअल क्लासेसने निकालाची सर्वोत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे. त्यामुळेच नवोदयची परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी आजघडीला आयडीअल क्लासेस मध्ये प्रवेश घ्यायला प्राधान्य देत आहेत.  अखंड मेहनत, विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनोखी शैली, विद्यार्थ्यांच्या पालकांशी नियमित संवाद यामुळे २ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला आयडीअल क्लासेसचा प्रवास आज शेकडोंच्या संख्येत जाऊन पोहचला आहे.
  
हे आहेत गुणवंत

यंदा नवोदय साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शशांक देवकर, आर्यन वाघ, ईशान ठोंबरे, सार्थ बोचरे, युवराज तुपकर, विश्वनाथ भोंडे, स्वरा पाटील, पियूष बारोटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
आपल्या पाल्यांना देखील नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी आयडीअल क्लासेस ला संपर्क करा: श्री दंदाले सर : 7745810895
श्री वाघ सर: 8805691493