एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा पोलिसांचेही तगडे नियोजन! एसपी, ॲडिशनल एसपी, २ डिवायएसपी अन् बक्कळ फौजफाटा; शेतकरी आंदोलकांची काळजी घेण्याच्या एसपींनी दिल्या सुचना....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांसाठी उद्या रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात एल्गार महामोर्चा निघणार आहे. दुपारी १२ वाजता जिजामाता प्रेक्षागार मैदानातून निघणारा हा एल्गार महामोर्चा जयस्थंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच सोयाबीन कापूस उत्पादक पट्टयातून हजारो शेतकरी उद्या बुलडाण्यात येणार आहेत त्यामुळे बुलडाणा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना एसपी सुनील कडासने यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. एसपी सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या देखरेखीखाली २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २५० पोलीस कर्मचारी,७५ महिला पोलिस कर्मचारी, ७० कर्मचाऱ्याचे २ दंगाकाबु पथक असा तगडा बंदोबस्त उद्या तैनात करण्यात येणार आहे.