BULDANA LIVE SPECIAL तुमच्या मोबाईलवरही वाजला का इमर्जन्सी अलर्ट? घाबरु नका..सायबर पोलिसांनी सांगितलं सत्य काय ते..

 
emergency
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज, २० जुलैच्या सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अनेकांचे मोबाईल खणखणत होते. मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट असा मॅसेज येत होता. नेमक काय होतय हे कुणालाच कळत नव्हत...हा सायबर गुन्हा तर नाही ना असेही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, आपल्या मोबाईलमधील डेटा तर चोरीला जाणार नाही ना अशा विविध शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. नेहमीप्रमाणे वाचकांनी बुलडाणा लाइव्ह ला फोन करून त्यांच्ये प्रश्न उपस्थित केले. आणि बुलडाणा लाइव्ह ने या प्रकरणाच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला. अखेर विविध सोर्स आणि सायबर पोलिसांशी बोलून बुलडाणा लाइव्ह ने नेमके यामागचे सत्य काय हे शोधून काढले आहे.
 

बुलडाणा लाइव्ह ने बुलडाणा सायबर पोलिसांशी यासाठी संपर्क साधला. त्यावेळी हा प्रकार आमच्यासाठी देखील नवीन आहे, आम्ही भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाशी संपर्क साधून याबाबत विचारणा करत आहोत असे सायबर पोलिसांनी सांगितले. सायबर पोलिसांचा दुरसंचार मंत्रालयाशी संपर्क झाल्यानंतर यातील खरे कारण समोर आले.  दूरसंचार मंत्रालयाने देशभरात २० ठिकाणी आणि आसपासच्या भागात एक ड्राईव्ह टेस्ट केली. व्हॉइस आणि डेटा सेवांसाठी मोबाईल टेलिफोन कंपन्याद्वारे देण्यात येणाऱ्या गुणवत्तेची चाचणी या ड्राईव्ह टेस्ट द्वारे करण्यात आल्याचे भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

   धोक्याची सूचना कळणार.

मार्च महिन्यातच केंद्र सरकारने सर्व स्मार्टफोन कंपन्यांना फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट सिस्टम लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. भविष्यात भूकंप, सुनामी किंवा इतर नैसर्गिक संकटाची पूर्व सूचना या अलर्ट वरून नागरिकांना देण्यात येईल. त्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना ६ महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्याआधीच मोबाईल कंपन्यांनी तशी सेवा सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठीच दूरसंचार मंत्रालयाकडून ड्राईव्ह टेस्ट करण्यात आली होती.