बुलडाणा लाइव्हने वानखेडची बातमी छापली अन् सगळ काही OK....

 
संग्रामपूर (स्वप्नील देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह मध्ये ५ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आले होते. दरम्यान वृत्त प्रकाशित होताच संबधित यंत्रणेला जाग आली गावातील स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
वानखेड गावात घाणीचे साम्राज्य पसरले होते. पावसाळा असल्याने ठिकठिकाणी डबके त्यावर मच्छर यामुळे रोगराईचा धोका होता. त्यामुळे बुलडाणा देव नाही यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करीत संबधित यंत्रणेला जाब विचारला होता. आता ग्रामपंचायत यंत्रणेला जाग आली असून त्यांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे.