पूरग्रस्तांच्यासाठी बुलडाणा जिल्हा सारथी ग्रुपकडून मदतीचा हात! बुलडाणा लाइव्ह कडे मदत सुपूर्द

 
sarthi group
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात २२ जुलैला अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंबाची वाताहत झाली आहे. बुलडाणा लाइव्ह ने पूरग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला. धान्य, कपडे, किराणा, शैक्षणिक साहित्याची पहिली खेप २८ आणि २९ जुलैला वितरीत करण्यात आली. दुसरी खेप ४ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या "बुलडाणा जिल्हा सारथी" या व्हॉट्स ॲप ग्रुप च्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी संकलित करण्यात आला. त्यातून जीवनावश्यक किराणा साहित्याची खरेदी करून ती मदत बुलडाणा लाइव्ह कडे सुपूर्द करण्यात आली.
 

जिथे जिथे गरज असेल तिथे सारथी ग्रुप मदतीसाठी सदैव तत्पर असतो.एप्रिल महिन्यात नांद्रे धांडे फाट्यावर झालेल्या अपघातात कु. भक्ती म्हस्के गंभीर जखमी झाली होती. तिच्या उपचारासाठी देखील सारथी ग्रुप ने मदतनिधी संकलित केला होता. आता पूरग्रस्त बांधवांसाठी देखील सारथी ग्रुप ने  निधी संकलित करून त्यातून किराणा साहित्याची खरेदी करीत ती मदत बुलडाणा लाइव्ह टीम कडे सुपूर्द केली. सारथी ग्रुप चे सादिक शहा, समाधान पाटील, आसिफ शेख यावेळी उपस्थित होते.