BREKING अवैध रेती वाहतूक करणारे मोकाट सुटले! चिखलीच्या खामगाव चौफुलीवर भरधाव टिप्परने तिघांना उडवले..

 
hjm

चिखली( गणेश धुंदाळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना कुठलाही धाक उरला नाही.. सरार्स पणे शेकडो टीप्पर अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात त्यांना कुणाच्या जीवाशी देखील काही देणे घेणे राहिले नाही अशी स्थिती आहे..चिखलीत थोड्या वेळापूर्वी घडलेल्या एका अपघातातून याची प्रचिती आली..चिखली येथील खामगाव चौफुलीजवळ असलेल्या यश कार डेकोर समोर दुचाकीवर असलेल्या तिघांना भरधाव टिप्परने उडवले..

प्राप्त माहितीनुसार अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर भरधाव वेगात देऊळगावराजा कडून येत होते. यश कार डेकोर समोर दुचाकीवर असलेल्या तिघांना या टिप्परने उडवले आणि टिप्परने पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवराज पाटील , सचिन बोंद्रे, निलेश चांदोरे, विलास चव्हाण यांनी जखमींना उपचारासाठी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले...

अन् टिप्पर पकडला...

अपघात झाल्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन पसार झाला, मात्र शिवराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून धोत्रा भनगोजी गावाजवळ टिप्पर पकडला. टिप्पर मध्ये अवैध रेती साठा असल्याचे समजते.  टिप्पर अवैध रेती उत्खनन व वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या डिग्रस येथील असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर चिखली पोलिसांकडून कारवाई सुरू होती..