BREAKING तुपकरांची मध्यस्थी, जलसमाधी आंदोलन सुटले! शेतकऱ्यांना घेऊन तुपकर निघाले कलेक्टर सायबांकडे! साडेचारला बैठक...
Aug 14, 2024, 15:51 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भक्ती महामार्गासाठी आज सकाळपासून पैनगंगा नदी पात्रात सुरू असलेले जलसमाधी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा निरोप मिळत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले होते. अखेर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांसोबत बैठक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आंदोलक शेतकऱ्यांना घेऊन रविकांत तुपकर, सौ ज्योतीताई खेडेकर, विनायक सरनाईक, हे सत्येंद्र भुसारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले आहेत. साडेचार वाजता आंदोलन शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांची भक्ती महामार्ग या विषयावर बैठक होणार आहे. आंदोलनाची पुढील रूपरेषा बैठकीनंतरच ठरणार आहे.