BREAKING रविकांत तुपकरांना अटक; सोयाबीन कापसाचे आंदोलन पेटण्याची शक्यता...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज,२५ नोव्हेंबरला बुलडाणा पोलिसांनी अटक केली. तुपकर यांच्या चिखली रोडवरील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे सोयाबीन कापसाचे आंदोलन आता पेटण्याची शक्यता आहे.
Bxnxn
 २० नोव्हेंबरला बुलडाण्यात एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलडाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. काल, त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती, अशा नोटीसांना आपण भिक घालत नाही असे तुपकर म्हणाले होते. दरम्यान आज त्यांच्या अटकेची पूर्वतयारी पोलिसांनी केली. बुलडाणा शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त आधी निवासस्थानी तैनात केला. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुलडाणा शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे..
Bxbxn
Hidjdj