Amazon Ad

BREAKING नो एन्जॉय.. काल लग्नाचा स्वागत समारंभ अन् आज लगेच स्विकारला पदभार! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी आयएएस विशाल नरवाडे यांची नियुक्ती झाल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी जिल्ह्यात धडकली. दरम्यान विशाल नरवाडे यांनी तातडीने पदभार देखील स्विकारला आहे. कालच विशाल नरवाडे यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ पार पडला आणि आज त्यांची बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्या झाल्या त्यांनी पदभार देखील घेतला.एकंदरीत नो एन्जॉय..आधी कर्तव्याला प्राधान्य असेच विशाल नरवाडे यांनी कृतीतून दाखवून देत जिल्हा परिषद प्रशासनात दमदार एन्ट्री केली.
  विशाल नरवाडे यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ काल, ३१ जानेवारीला धाड येथे संपन्न झाला. नरवाडे यांच्या अर्धांगिनी सौ.तेजस्विनी उपजिल्हाधिकारी आहेत. दरम्यान भाग्यश्री विसपुते यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आता विशाल नरवाडे बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. विशाल नरवाडे बुलडाणा तालुक्यातील सावळी गावचे रहिवाशी आहेत.थोड्या वेळापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली.