BREAKING मेहकर लोणार रस्ता दोन तासांपासून बंद! शारा ग्रामस्थांचा रास्तारोको; भीमजयंतीनिमित्त लावलेले झेंडे काढून फेकल्याचा आरोप

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भिमजयंती निमित्त लावण्यात आलेले झेंडे जातीयवाद्यांनी काढून फेकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे शारा ग्रामस्थांनी मेहकर लोणार रस्ता अडवून धरला आहे. दीड तासापासून हा रस्ता अडवण्यात आला आहे. बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी लोणारकडे रवाना झाले आहेत. सध्या रस्त्यात लाकडे टाकून ग्रामस्थांनी रस्ता अडवला आहे.