BREAKING आनंदवार्ता; बुलडाणेकरांची चिंता मिटली ! येळगाव धरणात १०० टक्के जलसाठा..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बुलढाण्याची लाईफ लाईन म्हणून ओळख असलेले येळगाव धरण १०० टक्के भरले असून,बुलढाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 
  गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. घाटाखालील परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असून, नळगंगा प्रकल्पातील पलढग धरण कालच ओव्हरफ्लो झाले. सुरुवातीला पावसाचा वेगकमी असल्याने पाणीटंचाई ची संभाव्य तीव्रता भासत होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने बुलढाणा शहर व लगतच्या खेड्यांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण पूर्णपणे भरले आहे, असे नगरपालिकाचे पाणीपुरवठा अधिकारी गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. धरणाची जलसंचयक क्षमता १२.४० इतकी आहे.