BREAKING बुलडाण्याला मिळाला खमक्या अधिकारी! शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी नरेंद्र ठाकरे; प्रल्हाद काटकरांची सायबर पोलीस ठाण्यात बदली

 
Narendra Thakre
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणेदार म्हणून नरेंद्र ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रल्हाद काटकर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. पुढच्या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत, त्याआधी त्यांच्यावर जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सायबर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्वाधिक व्यस्त पोलीस स्टेशन अशी ख्याती असलेल्या बुलडाणा शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. महिनाभरापूर्वी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी जबाबदारी स्वीकारणाऱ्या नरेंद्र ठाकरेंवर आता बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नरेंद्र ठाकरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कारकीर्द गाजवली होती. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला. खामगाव शहरात अल्पकाळात दरारा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. आता बुलडाणा शहरचे ठाणेदार म्हणून ते कशी कामगिरी करतात याकडे साऱ्यांचे लक्ष राहील.