ब्रेकिंग! थर्टिफर्स्टला जिल्हावासीयांना मिळाली 'लॉकडाऊन'ची भेट!

राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध; पर्यटन स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी कलम १४४ लागू!!
 
जिल्ह्यात पुन्‍हा निर्बंध… २८ जूनपासून दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंतच!; कृषी केंद्र सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक निर्देशांचे पालन न करता मनमानी पद्धतीने गर्दी करणाऱ्या जिल्हावासीयांसह ओमोक्रोनला रोखण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने  आपले रामबाण अस्त्र उपसले! परिणामी जिल्हावासीयांना नवीन वर्षाची भेट म्हणून लॉकडाऊनची नकोशी वाटणारी गिफ्ट मिळालीय! आज थर्टिफर्स्टच्या मुहूर्तावर हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, याची आज, 31 डिसेंबरपासूनच अंमलबजावणी  होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने हे गिफ्ट देतानाच राजकीय, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतील वारेमाप उपस्थितीला चाप आणि लगाम लावला आहे. यामुळे आता राजकीय, सामाजिक वा धार्मिक कार्यक्रम, मेळावे  केवळ ५० जणांच्या उपस्थितीत आयोजित करावे लागणार आहेत. बंदिस्त व खुल्या अशा दोन्ही जागांसाठी ही फिफ्टीची मर्यादा लागू आहे. लग्न समारंभासाठी हेच निर्बंध असून, ५० वऱ्हाडींच्या साक्षीनेच लग्न करावे लागणार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी केवळ २० व्यक्तींनाच हजर राहता येणार आहे. याशिवाय पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने, गर्दीची ठिकाणे आदी स्थळी संचारबंदी अर्थात कलम १४४ लागू करण्यात आले आहेत.

पोलीस व स्थानिक संस्थांना अधिकार
दरम्यान, या आदेशाचे भंग करणाऱ्यांविरुद्ध भादंवी १८६० चे कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याची जबाबदारी पोलीस व नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राहणार आहे. पुढील आदेशपर्यंत हा मिनी लॉक डाऊन लागू राहणार आहे.