BREAKING! सरकारी कामे खोळंबली! बुलडाण्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद! कर्मचारी,अधिकारी म्हणतात....

 
Buldana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपुर्ण राज्यभरासह बुलडाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आज १४ डिसेंबरपासुन राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. गेल्या कितेक वर्षापासून सुरु असलेली जुन्या पेन्शनची मागणी वर्षभरात संघटनेने रेटून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 
  यावेळी राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुन्या पेन्शन चा एल्गार पुकारण्यात आला आहे .यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागात प्रशासकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संघटनेतील कर्मचारी म्हणाले, "जोपर्यंत जुन्या पेन्शन बद्दल निर्णय होत नाही, तोपर्यंत कार्यालयात हजर राहणार नाही". अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे .