BREAKING! देऊळगाव घुबे येथील ग्रामसभेत अजब- गजब मागणी! खसखस, गांजा पिकविण्याची परवानगी द्या,सोयाबीन परवडत नाही...

 
देऊळगाव
देऊळगाव घुबे (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील देऊळगावघुबे येथील ग्रामपंचायतची आज,२९ ऑगस्टला ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत एक अजब गजब मागणी करण्यात आली,त्यामुळे ही ग्रामसभा चांगलीच गाजली..सोयाबीन परवडत नसल्याने गांजा आणि खसखस कोणाची परवानगी द्यावी अशी मागणी या ग्रामसभेत विलास एकनाथ घुबे यांनी केली.
 सोयाबीन, कापूस, गहू, हरभरा ही पिके परवडणारी नाहीत. खर्च भरमसाठ आणि हातात उत्पन्न नाही अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देण्याचे सरकारचे धोरण नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. शेतकऱ्याला आर्थिक सक्षम करण्यासाठी गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भर सभेत विलास घुबे यांनी ग्रामसभेत केली. तसा लेखी अर्ज देखील त्यांनी ग्रामसेवक व सरपंचांना दिला. यावर ग्रामसेवकांनी आपले मत व्यक्त केले. गांजा आणि खसखस या पिकांना लागवडीसाठी बंदी आहे त्यामुळे परवानगी देता येणार नाही असा शेरा या मागणीवर ग्रामसेवकांनी लगावला...