राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान पंधरवाडा! आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक जणांनी केले रक्तदान! आज,डोंगरखंडाळा येथील शिबिरात १११ युवकांचे रक्तदान

 
Fhgf
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान पंधरवाड्यानिमित्त आज, ५ मार्च रोजी डोंगरखंडाळा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १११ युवकांनी रक्तदान केले. 

राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या वतीने रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ७५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे नियोजन केले आहे. यामाध्यमातून २ हजार बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ४० शिबिरे संपन्न झाली आहेत. याद्वारे जवळपास दीड हजार पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे. 

दरम्यान ५ मार्च रोजी डोंगरखंडाळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी संदीपदादा शेळके, मालतीताई शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी  मंजुबाई गाडगे, अनंतराव पाटील, रमेश सावळे, वामनराव पाटील, निंबाजी पाटील, येडुबा काकडे, प्रभाकर सावळे, किशोर सेठ, मयूर बाहेकर, अशोक सावळे, राम सावळे, लक्ष्मण सावळे, राम देहाडराय, वसंता सावळे, शाम सावळे, योगेंद्र सावळे, रवींद्र सावळे, राजर्षी शाहू फाउंडेशनचे शैलेशकुमार काकडे, दीपक महाराज सावळे, संजय लोखंडे, शरद मोहिते, रवी काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.