BREAKING चिखलीत शेतकऱ्यांचा रस्ता रोको! मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांचा भक्तिमार्गाला विरोधच! तातडीने रद्द करा..

 
चिखली (ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेड राजा शेगाव भक्ती महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून रोखावे, अशी मागणी मार्ग प्रस्तावित झाल्यापासून होत आहे. यापूर्वी देखील जिल्हाभरात ठिकठिकाणी हा भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलने करण्यात आली. दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांना विश्वासात घेऊन महामार्ग रद्द केल्या जाईल. आज ४ जुलैच्या सकाळी चिखली शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून शासनाने तातडीने मार्ग रद्द करत चिंता दूर करावी असे आंदोलनातून सांगण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
 सिंदखेडराजा शेगाव हा भक्ती महामार्ग चिखली, देऊळगाव राजा, खामगाव , शेगाव, चिखली, सिंदखेडराजा या गावातून जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. सिंदखेड राजा ते शेगाव जाण्यासाठी पर्याय मार्ग उपलब्ध आहे, हा नवीन मार्ग निर्माण करण्याची आवश्यकता नाही. महामार्ग झाल्यास, शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विरोध असल्यास महामार्ग रद्द करू असे सांगितले. शेतकऱ्यांचा विरोधच आहे ! त्यामुळे तातडीने महामार्ग रद्द करण्यात यावा असे कृती समितीच्या वतीने बोलले जात आहे. यापूर्वी वेळोवेळी या मार्ग विरोधात आंदोलने झाली. राज्य शासनाने यावर तातडीने लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांची चिंता दूर करावी असे आंदोलक शेतकरी म्हणतात. आज सकाळीच होत असलेल्या रास्ता रोको आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला.