भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ऑटोला उडवले!;एक शेतकरी ठार, चौघे गंभीर,खामगाव - चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर आज सकाळची घटना! अंत्रज गावच्या पोळ्यावर विरजण..

 
Nrbrbr
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भाजीपाला घेवुन जाणाऱ्या ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे खामगाव- चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर घडली आहे.
अंत्रज कडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या ऑटोला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. आज १४ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. शिवाजी भारसाकळे यांच्या ऑटोमध्ये निलेश बगाडे (वय ३५) अनिल बगाडे (३४) पुरुषोत्तम बगाडे (३२) मोहन वानखडे (५०) (रा - अंत्रज ता - खामगाव) आपल्या शेतातील भाजीपाला खामगाव येथे मार्केटमध्ये विक्रीसाठी घेवून येत होते. याचवेळी खामगाव - चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावरील सिंधी नाल्याजवळ एक अज्ञात वाहनाने ऑटोला मागून धडक दिली. यामध्ये अनिल बगाडे यांचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींना अकोला हलविण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.