भाजपा वैद्यकीय आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. शैलेश वाघ! आमदार श्वेताताईनी दिले नियुक्तीपत्र.

 
Gghh
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी डॉ.शैलेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.चिखली मतदार संघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
डॉ. शैलेश वाघ रायपुर येथील आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते आरोग्यसेवा करत आहेत, शिवाय समाज घटकांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. दांडगा जनसंपर्क आणि दीर्घ अनुभव असल्यामुळे पक्षाचे धोरणे आणि विचार पोहोचवण्याची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली. नियुक्तीपत्र देत्यावेळी डॉ. राजेश्वर उबरहंडे, तालुकाध्यक्ष सुनील फेपा, साहेबराव गवते, शंकर तरमळे, विष्णू सास्ते उपस्थित होते.