भाजप नेते योगेंद्र गोडे कोरोना पॉझिटिव्‍ह!

 
योगेंद्र गोडे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. काल मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आज, ३१ डिसेंबर रोजी भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दोन दिवसांपूर्वी श्री. गोडे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली आहे. मागील २- ३ दिवसांत संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री. गोडे यांनी केले आहे.