वाढदिवस कसा साजरा करावा ते भाजप शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मांनी दाखवून दिलं; अशी जोपासली सामाजिक बांधिलकी ​​​​​​​

 
dff
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली वाढदिवस म्हटल की नुसती बॅनरबाजी, जेवणावळी अशीच तऱ्हा सगळीकडे आहे. त्यातल्या त्यात राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हटला की नुसती पैशांची उधळण हे समीकरण आहे. मात्र बुलडाणा भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा केलाय. भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनीदेखील सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवशी शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता, त्याच पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ शर्मा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत व्यर्थ खर्च टाळून  वाढदिवस समाजउपयोगी केला.
 

add

                         ( जाहिरात )

काल,१३ जुलै रोजी भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शहर भाजपने विविध सामाजिक उपक्रम राबवले. खामगाव रोडवरील दिव्य सेवा प्रकल्पावर मनोरुग्णांना ब्लँकेट या व मिठाईचे वाटप करण्यात आले. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या मनोरुग्णांसोबत सिद्धार्थ शर्मा यांनी केक कापून कौटुंबिक वाढदिवस साजरा केला.
बुलडाणा शहराला लागून असलेल्या झोपडपट्टी परिसरातील बालकांना व  गरजूंना देखील मिठाईचे वाटप वाढदिवसानिमित्त करण्यात आले.

समाजासाठी राजकारणात:सिद्धार्थ शर्मा!


 hhh

समाज हेच आपले दैवत आहे. समाजरुपी परमेश्वराची सेवा करण्यासाठीच भाजपचे राजकारण आहे. पक्षाने दिलेली ही शिकवणच आपण पाळत आहोत अशा भावना सिद्धार्थ शर्मा यांनी यावेळी व्यक्त केल्या.  यावेळी भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे, सचिन टेंभीकर,  हर्षल जोशी, नितीन बेंडवाल, विनायक भाग्यवंत, युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, शेख आसिफ, युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी, प्रितेश बेदमुथा, नितीन दासर, अमानुल्ला खा यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.