BIRTHDAY SPECIAL कर्तुत्वाने उभे राहिलेले दातृत्वशील नेतृत्व नंदुभाऊ मापारी! "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले समाज हाच माझा परमेश्वर..!

 
lonar
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मंदिरात जाऊन पूजापाठ करणारी, स्वतःच्या छोट्या कार्याचा गाजावाजा करणारी अनेक कर्तुत्वशून्य माणसं आपल्याला समाजात दिसतील..मात्र केलेल्या कार्याचा कोणताही गाजावाजा नाही, जे काही केलंय ते मी माझ्या समाजासाठी, माझ्या माणसांसाठी केलंय त्यामुळे ते माझ मोठेपण नाही असं म्हणतं प्रसिद्धीपासून दूर राहणारी मात्र समाजाला परमेश्वर मानणारी माणसं तशी दुर्मिळच! अशाच दुर्मिळ माणसांपैकी एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणजे श्री. नंदुभाऊ मापारी..!

 lonar

आज, ४ एप्रिलला नंदूभाऊंचा वाढदिवस! आतापर्यंतच अख्खं जिवनच सामाजिक जगणाऱ्या नंदुभाऊंचा वाढदिवस दरवर्षीच असतो सामाजिक संवेदना जपणारा.. यंदाचा वाढदिवसही त्याला अपवाद नाही. लोणारच्या शिवछत्र मित्र मंडळाने नंदुभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च सामाजिक उपक्रम हाती घेतलेत. मोतीबिंदूचे तपासणी शिबीर,महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांनी सामाजिक संवेदना जपणाऱ्या नंदूभाऊंचा वाढदिवस साजरा होत आहे.
      
समाजासाठी झटणारा कार्यकर्ता.!
   
लोणार शहर व तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात अन् जिल्ह्याच्या बाहेरही नंदुभाऊंनी गोतावळा निर्माण केलाय. राजकारणापलिकडीची नाती जपणारा नेता, कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झालीय. त्यामुळेच काम कोणतेही असो, कुणाचा दवाखाना असो की कुणाच्या सोयरीकीचे काम की कुण्या मुलाचा नोकरीचा विषय..फोन करायला नंदुभाऊ म्हणजे हक्काचा माणूस. यामुळे त्यांचा फोन सातत्याने खणखणत असतो. आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्पररतेने नंदुभाऊच सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्याने तयार झालाय. अतिवृष्टीने महावितरणचे खांब पडले असतील किंवा वीज गायब झाली असेल तर अधिकाऱ्यांना घेऊन नंदुभाऊ काम मार्गी लावायला पोहचलेच म्हणून समजा. कोरोनाकाळात देखील मदतकार्यात नंदुभाऊ अग्रेसर होते. सर्व धर्म समभाव, ज्येष्ठ आणि मातृशक्ती बद्दल आदर, गरजूंना मदत करणारे, परिसरातील युवकांना उच्चशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नरत असणारे, माणुसकी जपणारे  आणि अर्थकारण व राजकारणाला बाजूला ठेवून समाजकारणाला प्राधान्य देणारे म्हणून नंदूभाऊ परिचित आहेत.
समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून नंदुभाऊ झटतांना दिसतात.


   
  किंग नव्हे किंगमेकर..!

bh

                  (  जाहिरात👆🏻)

नंदुभाऊंनी ठरवलं असत तर आतापर्यंत अनेक निवडणुका गाजवल्या असत्या. स्वतः लाभाची पदे पदरात पाडून घेतली असती. मात्र तसे न करता कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक  ताकद देण्याचे काम नंदुभाऊ करतांना दिसतात. नव्या पिढीतील अनेक तरुणांचे नेतृत्व उभे करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. राजकारण हे लोकविकासाचे साधन झाले पाहिजे हा नंदूभाऊंचा विचार. विचारांची केवळ भाषणे द्यायची नसतात तर त्याची अंमलबजावणी करायची असते हा सिद्धांत नंदुभाऊ जगत आहेत. प्रत्यक्ष सक्रिय राजकारणात सहभाग नसला तरी लोणारच्या विकासासाठी त्यांची धडपड सुरूच असते. राजकारणातील कोणतेही पद न घेता सुद्धा प्रशासनावर वचक निर्माण करून लोकहिताची कामे मार्गे कशी लावायची हे नंदूभाऊंना चांगलेच माहीत आहेत. त्यामुळे किंग नव्हे किंगमेकर अशी नंदुभाऊंची ओळख आहे. समाज हाच माझा परमेश्वर आणि पांडुरंग आहे असं नंदुभाऊ सांगतात. समाजरुपी परमेश्वराची सेवा करण्याचे व्रत घेऊन व्रत्तस्थ जीवन जगणाऱ्या नंदुभाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!