BIRTHDAY SPECIAL वाढदिवस संवेदनशील नेतृत्वाचा! तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कुणाल बोंद्रेंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीचे माजी उपनगराध्यक्ष काँग्रेसनेते कुणाल बोंद्रे यांचा आज,५ डिसेंबर रोजी वाढदिवस..संधी मिळाली तेव्हा चिखली शहराचा कायापालट करण्यासाठी झटणाऱ्या या नेत्याकडे संवेदनशील नेतृत्व म्हणून पाहता येईल..वाढदिवसाचा ना बडेजाव, ना कुठलाही तामझाम...मागील वर्षीही कुणाल बोंद्रे यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला होता..
 

Dhanik

                                            जाहिरात 👆

मागील वर्षी चिखली नगरपरिषद प्रशासनाने  गोरगरिबांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा दिला होत्या. गरिबांच्या पोटावर पाय देण्याच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यादरम्यान कुणाल बोंद्रे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता संवेदनशीलतेचा परिचय दिला होता. "माझ्या कुटुंबाचे घटक असलेल्या चिखलीवासियांवर संकट असताना वाढदिवस साजरा योग्य नाही." असे म्हणत कुणाल बोंद्रे यांनी अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला होता.याहीवर्षी कुणाल बोंद्रे यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतोय.. वाढदिवसाकडे एक इव्हेंट म्हणून पाहण्याची सध्या स्पर्धा सुरू असताना कुणाल बोंद्रे यांनी मात्र स्वतःला त्यापासून कोसो दूर ठेवणे कौतुकास्पद म्हणावे लागेल..

  भाजपच्या बड्या नेत्याच्या पराभव करून केली होती राजकारणात एन्ट्री...

   भाजपच्या प्रदेश पातळीवरील मोठ्या नेत्याला पराभूत करून कुणाल बोंद्रे यांनी नगरपरिषदेच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती. त्यानंतर कुणाल बोंद्रे चिखलीतील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते. उपनगराध्यक्ष म्हणून कुणाल बोंद्रे यांनी कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्यानंतर कुणाल बोंद्रे यांच्या अर्धांगिनी सौ प्रियाताई बोंद्रे ह्या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी शेकडो कोटींची विकासकामे चिखली शहरात करण्यात आली होती. चिखली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम कुणाल बोंद्रे आणि प्रियाताई बोंद्रे यांनी ५ वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केले आहे. शिवाय विविध सामाजिक उपक्रमात सुद्घा कुणाल बोंद्रे सातत्याने सहभागी असतात. आज वाढदिवशी त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..