भूमिपुत्र वामनदादा कर्डकांची जयंती! बुलडाण्यात गुरूवारी भरगच्च कार्यक्रम,कसे आहे नियोजन..वाचा...
Aug 12, 2024, 09:50 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advt 👆
महाकवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आ.गायकवाड यांच्यासह विशेष उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. सदानंद देशमुख, माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, कुणाल गायकवाड, दिलीप जाधव, माधवराव हुडेकर, गोविंद गायकी, दादासाहेब क काटकर, प्रा. दादाराव गायकवाड, अड. सुमित सरदार, अड. अशोक इंगळे, मांगीलाल राठोड, डॉ. गणेश गायकवाड, प्रशांत जाधव हे राहणार आहेत.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शाहीर लोककलावंतांची पारंपारीक वेशभुषेत व वाद्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा जयस्तंभ चौक ते वामनदादा कर्डक पुतळा हुतात्मास्मारका पर्यंत अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. तर सकाळी ११ वाजता अभिवादन सभा होऊन दुपारी १ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शहरातील नागरीकांनी तसेच कलावंतांनी उपस्थित राहावे असे आवाहन वामनदादा कर्डक स्मारक समिती व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.