शेतात जातांना दुचाकीने उडवले; अपघातात शेतकऱ्याचा जागीच जीव गेला! सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

 
Ndnd

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल, ३ सप्टेंबर रोजी पांगरखेड रस्त्यावर घडली.

सिंदखेडराजा येथील रहिवासी असलेले शेतकरी बाबुराव खंडूजी मेहेत्रे हे काल ,३ सप्टेंबर रोजी दुचाकी क्रमांक एमएच-२८-
बीएन-३१७० ने सिंदखेड राजा येथून पांगरखेड रोडवर असलेल्या त्यांच्या शेताकडे जात होते. काही अंतरावर गेल्यानंतर समोरुन येणाऱ्या दुचाकीने मेहेत्रे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात मेहेत्रे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक बाबुराव मेहेत्रे यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.