BIG NEWS संग्रामपूर बाजार समितीत महाविकास आघाडीची हार! महायुतीने फडकवला विजयाचा झेंडा! १२ उमेदवार विजयी, आघाडीला केवळ ६ जागा!

 
फवभ
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने १८ पैकी १२ जागा जिंकून सत्ता हाती घेतली आहे. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले.या विजयाने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्यासह सत्ताधारी पक्षाना मोठा दिलासा मिळाला आहे.
 संग्रामपूर बाजार समितीसाठी काल १८ नोव्हेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत उत्साही म्हणजे ९७.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. आज रविवारी सकाळी वरवट बकाल येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक महेश कृपलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. मतमोजणी अंती निकाल जाहीर करण्यात आला असून विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहे.
महायुतीप्रणित शेतकरी विकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये संजय इंगळे,उमेश टावरी, प्रदिप वडोदे, रविंद्र रावणकार, श्रीकृष्ण बोरसे, राजेंद्र ठाकरे, भाऊराव अवचार, चित्रा ज्ञानदेव मुयांडे, शांताराम दाणे, सुरेश तायडे, संतोष राजनकार व रमेश फाळके तर महाविकास आघाडी कृत शेतकरी सहकार महाविकास आघाडी पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये राजेंद्र वानखडे, अभयसिंह मारोडे कुसुम वखारे, शेख सलीम ,श्रीकांत मारोडे, रवींद्र झाडोकार यांचा विजय झाला आहे.