मोठी बातमी! शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या गाडे बंधूंना अटक; मलकापुरातून उचलले! शेतकरी चिखली पोलीस ठाण्यात जमले

 
policestation
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या गाढे बंधूंना अखेर आज,१८ एप्रिलला अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूरातून गाढे बंधूंना उचलले. त्यांच्यासमवेत त्याचा साथीदार येळवंडे यालाही अटक करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 

 चिखली तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक या व्यापाऱ्यांनी केली होती. स्वतःला नादार घोषित करण्याच्या हालचाली देखील त्यांनी चालवल्या आहेत. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, एसपी यांच्या भेटी घेत तक्रारी दिल्या होत्या. १५ एप्रिलला चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर वाढता दबाव असल्याने पोलिसांनी विविध पथके गठित केली होती. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड याप्रकरणात लक्ष घालून होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. मलकापुरात आरोपी काय करत होते, ते तिथे कसे पोहचले याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिली नाही. दरम्यान गाडे बंधूंच्या अटकेची बातमी कळताच चिखली पोलीस ठाण्यात पीडित शेतकरी जमले आहेत. तिघाही आरोपींना आज पोलीस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.