मोठी बातमी !राजकीय नेत्यांच्या आक्रमकतेनंतर आता पत्रकारही आक्रमक! वार्तांकन करण्यासाठी अडवले; व्हॉईस ऑफ मिडीया व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

 
Dghj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकर यांचे आंदोलन चांगलेच चिघळले आहे. पोलिसांनी आधी राजकीय नेत्यांना रविकांत तुपकर यांना भेटण्यासाठी मज्जाव केला. त्यानंतर नेत्यांनी ठिय्या आंदोलन केल्यावर नेत्यांना आत सोडण्यात आले. मात्र पोलिसांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यात आत जाऊ दिले नाही.

पोलिसांच्या या भूमिकेबद्दल पत्रकारांनी सुद्धा निषेधाची भूमिका घेतली आहे. व्हॉईस ऑफ मीडिया चे राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनीसुद्धा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दुपारी आंदोलनावर लाठीचार्ज करीत असताना पोलिसांनी काही पत्रकारांना धक्काबुक्की सुद्धा केली होती, त्याचाही निषेध करण्यात येत आहे. घटनेचा वार्तांकन करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे,असे राजेंद्र काळे यांनी म्हटले आहे.