अमडापुरात शुल्लक कारणावरून मोठा वाद ! लाट्या काठ्यांनी डोके फोडले, दगडफेक झाली ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल!
Jan 18, 2024, 19:53 IST
अमडापुर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शुल्लक कारणावरूनअमडापुरात मोठा वाद घडला. त्यामध्ये १६ जानेवारीच्या रात्री ७ ते ८ जणांनी मिळून एकाचे डोके फोडले, त्यांनतर दगडफेक केली. दरम्यान अमडापुर शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. घटनेतील दोषींवर अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शेख हैदर शेख कादर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहरुख खान, फारुख खान, तहीर खान, अन्सार खान, अलयार खान, समीर खान व इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर घटनाक्रम असा की, १५ जानेवारीला शेख हैदर शेख कादर बाजारपेठे मधील त्यांच्या दुकानात बसून होते. त्याचवेळी अलयार खान त्यांच्या दुकानात आला, एजाजच्या वाढदिवशी तुम्ही माघारी शिवी का दिली? असं म्हणून त्याने वाद घालायला सुरुवात केली. त्यांनतर हैदर शेख यांनी त्याची समजूत काढून त्याला घरी पाठवले. मात्र दुसऱ्या दिवशी (दि.१६ जानेवारीला) हैदर शेख त्यांचा मुलगा सोहेलसह घरी गेले होते. रात्री ८ वाजेच्या वेळेस सोहील हा घराखालील तक्कल पान दुकानात उभा होता. त्याचवेळी शाहरुख खान ,ताहीर खान आणि फारुख खान त्या ठिकाणी लाट्या काट्या घेऊन आले. व शिवीगाळ का केली असे म्हणत.. त्यांनी सोहीलच्या डोक्यावर वार केला. त्यामध्ये सोहील जखमी झाला. त्यांनी लाथा बुक्क्यांनी सोहिलला मारहाण सुद्धा केली असे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यानंतर शेख हैदर त्या ठिकाणी आले त्यांनी वाद सोडविला. परंतु त्यानंतर सुद्धा त्यांनी अन्य सहकाऱ्यासह शेख हैदर यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर शेख हैदर शेख कादर यांनी पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण घटना सांगितली. त्यानुसार सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील करत आहेत.