BIG BREKING चिखली नगरपरिषदेत राडा! पाणी आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक! अधिकाऱ्यांच्या समोर टाकला बेशरमीचा पाला

 
Ndndn
चिखली( गणेश धुंदळे: बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा): चिखली नगरपरिषदेत आज ७ जूनच्या दुपारी चांगलाच राडा झाला. महाविकास आघाडीचे पदाधिकारी शहरातील प्रश्नांवरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. १५ दिवसानंतर आणि तेही अनियमित होणारा पाणीपुरवठा , स्वच्छतेचे वाजलेले तीन तेरा या मुद्द्यांवर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे वागणे निर्ल्लजपणाचा कळस असल्याचा आरोप करीत अधिकाऱ्यांच्या दालनात बेशरमीचा पाला टाकण्यात आला आहे.
 प्रशासक गैरहजर असल्याने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर देखील बेशरमाचे झाड ठेवण्यात आले. सध्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली असून जनतेच्या प्रश्नांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मात्र वृत्त लिहिस्तोवर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने अजून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने पदाधिकारी चांगलेच आक्रमण झालेले आहेत.
   काँग्रेस नेते तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे, काँग्रेस शहराध्यक्ष काझी, माजी नगरसेवक निलेश अंजनकर, माजी नगरसेवक दीपक खरात, माजी नगरसेवक गोकुळ शिंगणे, शिवसेना शहरप्रमुख माजी नगरपरिषद उपाध्यक्ष श्रीराम झोरे
राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील, सुभाष देवडे, रहीम पठाण, शिवसेना नगरसेवक दत्ता सुसर, रवी पेटकर, बबलू शेख, नगरसेवक राजू रज्जाक, यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलन करीत आहेत.