BIG BREKING बारावीचा गणिताचा पेपर फुटला! साडेदहा वाजताच व्हाट्सअपवर व्हायरल; सिंदखेडराजा तालुक्यातील प्रकार!

 
paper
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आज, वर्ग १२ विचा गणिताचा पेपर होता. मात्र सकाळी ११ वाजता पेपर सुरू होण्याआधीच पेपर व्हाट्सअप वर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  सिंदखेडराजा तालुक्यातील  राजेगावातून ही बातमी समोर आली आहे.

dddd

              (जाहिरात👆)

 यंदाची बारावीची परीक्षा पहिल्या पेपर पासून चर्चेचा विषय ठरली आहे. इंग्रजीच्या पेपर मध्ये चक्क उत्तर छापण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान आज,३ मार्चला गणिताचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील परीक्षा केंद्रावरून हा पेपर फुटल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल संदेशात म्हटले जात असले तरी त्याबाबतीत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सकाळी साडेदहाला अनेक विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांच्या व्हाट्सअप वर पेपर पहायला मिळाला. दरम्यान पेपर फोडणारा, व्हायरल करणारा कोण? याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी याप्रकारची पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे वृत्त आहे.