BIG BREAKING जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली! दोन महिन्यात असं काय झालं?

 
Buldhana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली झाली आहे. कोल्हापूर येथे त्यांची बदली करण्यात आल्याचे समजते. 
दोन महिन्यांपूर्वीच कुलदीप जंगम यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. ७ जून रोजी ते बुलढाणा जिल्हा परिषदेत रुजू झाले होते, मात्र आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे. एवढ्या कमी कालावधीत त्यांची बदली का करण्यात आली याचे कारण कळू शकले नाही.