BIG BREAKING खर सांगा, तुम्ही खासदारकीसाठी उभे राहणार का? भारत गणेशपुरे यांच्या प्रश्नांवर संदीप शेळकेंनी स्पष्टच सांगीतल...

 
 Bhgk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी आज "जाहीरनामा  जनतेचा" या अभियानाचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी संदीप शेळके यांची मुलाखत घेतली. 

खर सांगा, तुम्ही खासदार साठी उभे राहणार का? असा थेट प्रश्न मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात  भारत गणेशपुरे यांनी विचारला, त्यावर संदीप शेळके म्हणाले, "जनतेच्या जाहीरनामा' या  अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची मते जाणून घेणार आहोत, जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील युवकांची ,शेतकऱ्यांची, उद्योजकांची मते जाणून घेण्यात येतील. येत्या दोन महिन्यात हा जनतेचा जाहीरनामा तयार होईल. त्यानंतर हा जाहीरनामा तयार झाल्यानंतर लोकांना वाटल तर मी निश्चीत लोकसभा निवडणूक लढेल असे संदीप शेळके म्हणाले. जनतेची मागणी झाली तर लोकसभा निवडणूक १०० टक्के लढणार, जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर नेणार असे संदीप शेळके म्हणाले. "तुम्ही कोणता झेंडा हाती घेणार? " असा प्रश्न भारत गणेशपुरे यांनी विचारला असला "माझा पक्ष जनता आणि युवकांना रोजगार" हा असणार आहे असे संदीप शेळके म्हणाले..