BIG BREAKING संदीप शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल! संदीप शेळके म्हणाले, गुन्ह्यांच काय घेऊन बसलात, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व अर्पण करण्याची आमची तयारी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळकेंच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजर्षी शाहू मल्टीस्टेट तथा धनिक ॲडव्हायझर्स च्या वतीने काल, २९ जानेवारीला बुलडाण्यातील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणावर "न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यक्रम सुरू ठेवून ध्वनिक्षेपक वाजवल्याचा ठपका त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान संदीप शेळके यांनी याबद्दल पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संदीप शेळके याबद्दल एक फेसबुक पोस्ट केली आहे.
Add
   जाहिरात 👆
 संदीप शेळके यांच्यासह कृष्णा सावळे आणि इतर ३ अशा ५ जणांविरुद्ध पोलिसांनी कार्यक्रमाच्या परवानगीचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. संदीप शेळकेंनी याबद्दल समाजमाध्यमांवर पोस्ट करीत प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे संदीप शेळकेंची फेसबुक पोस्ट? 
 "राजर्षी शाहू मल्टीस्टेट आणि धनिक ॲडव्हायझर्स च्या वतीने न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. नियोजित वेळेपेक्षा काही मिनिटे कार्यक्रम उशिरापर्यंत चालला म्हणून पोलिसांनी माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले, हरकत नाही..पोलिसांनी पोलिसांचे काम करावे..पण जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय पुढारी कायदा पायदळी तुडवतात ते पोलिसांना दिसत नाही का? हा माझा सवाल आहे..वन बुलडाणा मिशन आणि आम्ही करत असलेल्या कामांना जनतेचा उस्फुर्त मिळत आहे..हे कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असेल, असो...पण पोलिसांनी कुणाच्या इशाऱ्यावर काम करू नये..!आणि गुन्ह्यांच काय घेऊन बसलात...जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आमचा अजेंडा आहे..त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची आमची तयारी आहे..." अशा शब्दात संदीप शेळके यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे.