BIG BREAKING जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बदली पुन्हा एकदा बदली! शुभम गुप्ता अजूनही रुजू झाले नव्हते...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रशासकीय वर्तुगातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वी शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली होती मात्र मोठा कालावधी उलटून देखील ते रुजू न झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. विशाल नरवाडे यांची बदली झाल्यानंतर शुभम मुक्ता यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र तर अद्याप रुजू झाले नव्हते. त्यामुळे त्यांचा रजा कालावधी गृहीत धरून गुप्ता यांची सांगली - मिरज - कुपवाड महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना तात्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिली आहेत. सध्या बुलढाणा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी पदाचा प्रभार बी.एम.मोहन यांच्याकडे आहे.