BIG BREAKING बुलडाणा जिल्ह्याला नवे एसपी मिळाले! सुनील कडासने जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक

 
Sp buldana
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सारंग आवाड यांची पदोन्नती झाल्यानंतर जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक कोण मिळतील याची सर्वांनाच उत्सुकता होती.अखेर आज, ८ मेच्या मुहूर्तावर जिल्ह्याला नवे एसपी मिळाले आहेत.
सुनील कडासने यांची जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरविंद चावरिया यांच्यानंतर सारंग आवाड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक झाले होते.मात्र अगदी वर्षभरातच त्यांचे प्रमोशन झाल्याने ते पुण्याला बदलून गेले. आता सुनील कडासने जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कडासने यांनी केलेली कामगिरी राज्यभर गाजली होती. पैसे खाणाऱ्यांवर वचक बसवणारे अधिकारी म्हणून कडासने यांची ओळख आहे.