BIG BREAKING एएमआयमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी बुलडाणा शहरात! जयस्तंभ चौकात फुटले फटाके! लागले "हे" नारे..

 
hgjkl
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):एएमआयमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार   असदुद्दीन ओवेसी यांनी आज बुलडाणा शहराला धावती भेट दिली.  शहरातील जयस्तंभ चौकात असदुद्दीन ओवेसी यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.

मलकापूरात आज संध्याकाळी असदुद्दीन ओवेसी एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मलकापूरातील दारुल उलूम युसुफिया मदरशामागील जागेत ही सभा होणार आहे.छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मलकापूर ला जात असताना  बुलडाणा शहरातील ज्यस्थंभ चौकात असदुद्दीन ओवेसी यांचे एएमायएम च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले. यावेळी देखो देखो कौन आया..शेर आया शेर आया, नारा - ए - तकबीर अल्लाह - हु - अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मलकापूरच्या सभेत असदुद्दीन ओवेसी काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.