BIG BREKING! शेतकरी आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर; लाठीचार्ज केला! तूपकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन गेले
Feb 11, 2023, 15:44 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचे आंदोलन चांगलेच चिघळले आहे..तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने पोलिसांनी आवरल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र तरीही आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला अशी भूमिका तुपकर यांनी घेतली..जिल्हा कृषी अधिकारी , बुलडाणा तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी येत तुपकर यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र तुपकरांचे समाधान झाले नाही..अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांना बळाचा वापर करून धरपकड केली. शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनाही पोलिसांनी अटक केल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आंदोलन स्थळी चपलांचा खच पडला आहे.