BIG BREKING! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे रविकांत तुपकरांना भेटायला पोलीस ठाण्याबाहेर! पोलिसांनी बोंद्रेंना अडवले! बोंद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मारून बसले..

 
Tuuhfg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज पोलिसांच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत डिझेल ओतून घेतले. दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान तुपकरांना सध्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

संध्याकाळी सातच्या सुमारास माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे तुपकर यांना भेटायला पोलीस ठाण्याबाहेर आले. मात्र पोलिसांनी राहुल बोंद्रे यांना अडवले असून पोलिस बोंद्रे यांना आत सोडायला तयार नाहीत. राहुल बोंद्रे  यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला असून पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बोंद्रे यांनी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला असून परिणाम वाईट होतील असे म्हटले आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही बोंद्रे यांनी म्हटले..सध्या राहुल बोंद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत.

२० मिनिटांच्या ठिय्या आंदोलनंतर पोलिसांची भूमिका बदलली...

राहुल बोंद्रे यांनी २० मिनिटे ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांना पोलिसांनी  पावणेसातच्या सुमारास आत सोडले. मला ठिय्या आंदोलन करायची वेळ का येऊ दिली असा जाब यावेळी बोंद्रे यांनी विचारला...अखेर राहुल बोंद्रे तुपकर यांच्या भेटीसाठी पोलीस ठाण्यात गेलेच..!