मोठा अपघात!लक्झरी बस पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली; १ महिला ठार; २० पेक्षा अधिक जखमी;खामगाव- चिखली रस्त्यावरील पेठ जवळील पुलावर "या" कारणामुळे झाला अपघात?

 
jfjfj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव चिखली रस्त्यावरील पेठ जवळील पैनगंगा नदीच्या पुलावरून लक्झरी बस नदीत कोसळली. ९ मेच्या मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात १ महिला ठार तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

स्वरा ट्रॅव्हल बस जळगाव जामोद वरून पुण्याकडे जात होती. पेठ जवळच्या अरुंद पुलावरून ही बस नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अमडापुर आणि चिखली पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे एका ४१ वर्षीय महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले, मृतक महिलेच्या पतीसह तिची मुलगी या अपघातात जखमी झाली आहे.
yghu    
अरुंद पुलामुळे झाला अपघात?
 
पेठ जवळच्या पैनगंगा नदीवरील पुल हा खूपच अरुंद आहे. एकावेळी दोन मोठी वाहने पुलावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. याशिवाय या पुलावर कठडे सुद्धा नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात पुल कुठपर्यंत हे समजण्यात नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडतो. रात्री झालेल्या अपघाताचे सुद्धा हेच कारण आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाची रुंदी वाढवण्यात यावी, त्याला कठडे बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.