बिबीचे मंडळ अधिकारी खारवाल निष्क्रिय? हकालपट्टी करण्याची मागणी!

 
Bdbfh
बिबी (जयजित आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार तालुक्यातील बिबी येथील मंडळ अधिकारी खारवाल यांची हकालपट्टी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत त्यांनी मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे दिले. इतकचं नाही तर खारवाल यांच्या आशीर्वादाने बिबी परिसरात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. 
सदर निवेनात नमूद आहे की, खारवाल यांनी
बिबी मंडळाचे पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी शेतकऱ्यांची कामे वेळेवर केली नाही, शेतकऱ्यांचे फेरफार सुद्धा खारवाल हे वेळेवर रुजू करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकरी खारवाल यांना भेटण्यासाठी तलाठी कार्यालयावर गेले असता ते बिबी मंडळातील कोणत्याच तलाठी कार्यालयावर उपस्थित नसतात. शेतकऱ्यांनी त्यांना फोन केला तर ते अपमानास्पद बोलतात. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतातील विहीर सातबारावर घेण्यासाठी शेतकरी पूर्वीप्रमाणे शंभर रुपये च्या स्टॅम्पवर तहसील कार्यालयातून अँफीडिवेट करून तलाठी यांच्याकडे देतात. तलाठी यांनी फेर घेऊनही खारवाल सदर विहिरीचे फेरफार रुजू करत नाही. याउलट शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे सातबारावर विहिरीची नोंद करण्याचा सल्ला देतात. ग्रामीण भागातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा नोंदणी करता येत नाही. व सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे सुद्धा शेतकरी सातबारावर विहिरीची किंवा बोरची नोंद करू शकत नाही. तसेच वारस फेरफार घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलचा वारस फेरफार आदेश न करता रजिस्ट्री बक्षीस पत्र किंवा खरेदी करावी असा गजब सल्ला सुद्धा खारवाल शेतकऱ्यांना देतात,तर दुसरीकडे खारवाल यांच्या आशीर्वादाने रेती मुरूम माफीयांचा परिसरात सुळसुळाट आहे. त्यांच्याशी खारवाल यांचे आर्थिक देणे घेणे आहे असे निवेदनात म्हटले आहे, परिसरामध्ये रेती व मुरुमाचे उत्खनन जोरात सुरू आहे असा सुद्धा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला. येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत खारवाल यांची बिबी मंडळातून हकालपट्टी न केल्यास ६ फेब्रुवारी रोजी लोणार तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून शेतकऱ्यांनी दिला आहे निवेदनावर स्वाभिमानीचे सहदेव लाड, लांडगे, अरुण वाघ ,विजय फोलाने, रविंद्र खरात, विलास राठोड, रंगनाथ बिन्नीवाले ,बबन राऊत ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत