भूमिपुत्र वैदकीय मदत कक्षेतून फोन गेला अन् नागपूरचे एम्स रुग्णालय जागी झाले ! रुग्णाचे उपचार सुरू; नातेवाईकांनी ना. जाधवांचे आभार मानले!

 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भरती करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येताच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षेतून फोन गेला. यांनतर रुग्णाला भरती करून त्याच्यावर सुरू झाले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी ना. जाधव यांचे व वैद्यकीय मदत कक्षातील चमुचे आभार मानले. 
केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना झाला पाहिजे. याहेतूने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित जनसंपर्क कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष गेल्या आठ दिवसापूर्वीच स्थापन केले आहे. याकक्षेत दररोज अनेकरुग्ण व नातेवाईक आरोग्य सेवेच्या संदर्भात मदत घेण्यासाठी येत आहे. मेहकर येथील अनिल वराडे यांचे सासरे गजानन महाकाळ यांना हार्टे आणि किडनीचा गंभीर आजार आहे त्यांचे हार्ट फक्त २०% काम करीत होते किडनी ही गंभीर स्थितीत असताना क्रिएटिन लेव्हल 4.33 एवढी होती अशा वेळेस नागपूर येथील हॉस्पिटलमधील डॉक्टर्स त्यांना भरती करून घेण्यास तयार नव्हते.
त्यावेळेस त्यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे विश्वासू अजय उमाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व यासंदर्भाची माहिती त्यांना दिली त्याचवेळी अजय उमाळकर यांनी बुलढाणा येथील भूमिपुत्र वैद्यकीय कक्षेचे प्रमुख राजीव भोर यांच्याशी संपर्क साधून अनिल वराडे यांच्या नातेवाईका संदर्भातील आजारावषयी माहिती दिली. भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्या वतीने नागपूर येथील प्रवीण शर्मा यांना यासंदर्भाची माहिती देण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकाला कोठेही फोन न करता त्या ठिकाणी राजू हेडाऊ यांनी येऊन लगेच गजानन महाकाळ यांना नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार करिता भरती करण्यात आले. भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षेच्या माध्यमातून झालेल्या मदती नातेवाईकांनी आभार मानले.