सिंदखेड राजा बाजार समितीत शेतकरी भवनचे भूमिपूजन

 
file photo
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील कृषि उत्पन्‍न बाजार समितीच्या आवारात पिकेल ते विकेल या अभियानातंर्गत शेतकरी भवनचे भूमिपूजन आज, १२ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी नामफलकाची फितही कापण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव, पंचायत समिती सभापती मीनाताई बंगाळे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक सतीष तुपकर आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.