केंद्रीय अर्थसंकल्पावर भाईजी म्हणाले...सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प

ते म्हणाले की,बुलडाणा अर्बन गोदाम व कोल्डस्टोअरेचा व्यवसाय २५ वर्षा पासुन करीत आहे. हा व्यवसाय देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वाचा आहे. संस्थेच्या याच उपक्रमासाठी केंद्र सरकार गोदाम व कोल्डस्टोरेजचा व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देणारअसून, ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
याशिवाय अर्थसंकल्पात आयकर मर्यादा ७,००,००० रुपयांपर्यंत वाढविल्यामुळे सर्वसामान्य जनतेची पैशांची बचत वाढणार आहे व त्यामुळे जनतेची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला गती येईल. केंद्र सरकार पायाभुत सुविधासाठी मोठया प्रमाणात गुंतवणुक करणार असल्यामुळे शहरात व ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण होवुन युवकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. तसेच महिलांसाठीही विशेष योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. एकंदरीत अर्थसंकल्पात सर्वासाठीच काहीना काही देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. असे, मत बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी व्यक्त केले.