झाडावर चढले अस्वल, अर्ध्या तासापासून अस्वलाला खाली उतरवण्याचा प्रयत्न ; बुलडाण्यात थरार...
Jul 22, 2024, 13:32 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहर ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे अनेकदा वन्य प्राण्यांचा संचार मानवी वस्तीतही पाहायला मिळतो. आज,२२ जुलैला पुन्हा तसाच थरार बुलडाणेकरांना पाहायला मिळत आहे. बुलडाणा शहराला लागून असलेल्या हनुवतखेड भागातील एका झाडावर एक अस्वल चढलेले असून, त्याला उतरवण्यासाठी वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे, बघ्यांची मोठी गर्दी ही त्या ठिकाणी आहे. हनुवतखेड हद्दीतील इंदुमती महाविद्यालयाजवळील झाडावर हे अस्वल चढलेले आहे.