बहाद्दर रस्त्यातच चुकीचं काम करत होता! पोलिसांनी रंगेहाथ पकडलं! हतेडी जवळील घटना..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १६ जानेवारीला भररस्त्यात चुकीचं काम करताना ग्रामीण पोलीसांनी एकाला पकडलं. दिवसाढवळ्या वरली मटक्याच्या चिट्ट्या लोकांना वाटप करून त्यांच्याकडून पैसे घेत असताना कोलवड येथील राजू जोहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून एक पेन, ३८० रुपये रक्कम पोलिसांना मिळाली. 
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. हतेडी बसस्थानक परिसरात त्याला रंगेहाथ पकडले. ग्रामीण भागात अश्या प्रकारच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गाव खेड्यातील पवित्र वातावरण भंग करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. अवैध धंद्यावाल्यांचा मुख्य स्त्रोत पोलिसांच्या तावडीत येणे गरजेचे आहे.