आयुष्मान खुरानाने मुंबईत घेतले घर; स्वप्नपूर्तीसाठी खर्च केले तब्बल इतके कोटी...

 
स्वतःच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आयुष्मान खुरानाने वेगळा ठसा उमटवला आहे. चित्रपटांची योग्य ती निवड आणि दमदार अभिनय यामुळे त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. व्यावसायिक आयुष्यात स्वतःला सिद्ध करणाऱ्या आयुष्मानने मायानगरी मुंबईत स्वतःचे नवे घर खरेदी केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयुष्यातील हे महत्त्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल १९ कोटी रुपये खर्च केले आहेत. एकाचवेळी ४ कार पार्किंग करण्यासाठी या घरात जागा आहे. लवकरच आयुष्मान पत्नी व मुलांना घेऊन नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. ४ हजार २७ स्क्वेअर फूट एवढे भव्य असलेल्या या घराची खरेदी २९ नोव्हेंबर २०२१ झाली. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून आयुष्मानने ९६ लाख ५० हजार रुपये भरले आहेत. याआधी आयुष्यमानने पंचकुला येथेसुद्धा मोठा बंगला खरेदी केला आहे.