११ जानेवारीला चिकू, रामफळ, चिंच फळांचा लिलाव

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाण्याच्या जिल्हा फळरोप वाटिकेतील १०५ चिकू मातृवृक्ष, ३८ रामफळ मातृवृक्ष आणि ८ चिंच मातृवृक्षांच्या फळांचा जाहीर लिलाव ११ जानेवारीला जिल्हा फळरोपवाटीका, धाड रोड, बुलडाणा येथे आयोजित केला आहे.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जाहीर लिलावास इच्छुक असणाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि अधिकारी सचिन चेके यांनी केले आहे.