वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा! पप्पुसेठ राजपूत यांचे समाजबांधवांना आवाहन; गावागावात होतायेत जनजागृती सभा

 
ddd
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येत्या १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलन होणार आहे. सकल राजपूत समाज द्वारे आयोजित या महासंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महासंमेलनाचे चिखली तालुका संयोजक तथा रामा ट्रॅक्टर्सचे संचालक शिवदास उर्फ पप्पूसेठ राजपूत यांनी केले आहे. चिखली तालुक्यातील गावागावात समाजबांधवांच्या बैठकी घेऊन पप्पूसेठ राजपूत व त्यांचे सहकारी महासंमेलनाचा जागर करीत आहेत.
 

 महाराष्ट्रातील राजपूत /परदेशी भामटा समाज  बांधवांच्या शासन व प्रशासन स्तरावरील न्याय मागण्यांसाठी हे महासंमेलन होणार आहे. या महासंमेलनाला भारत सरकारचे संरक्षण मंत्री मा.ना. राजनाथ सिंह यांची उपस्थिती असणार आहे. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या महासंमेलनाला उपस्थित राहणार आहेत. शासनाला समाजाच्या समस्या अवगत करून देण्यासाठी समाज बांधवांची एकजूट या संमेलनात दिसली पाहिजे.  त्यामुळे समाज बांधवांनी या ऐतिहासिक महासंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पप्पूसेठ राजपूत यांनी केले आहे.