अंचरवाडीत आज हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंतीचा माहौल! आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निधीतून केलेल्या पुतळा सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण!
गौरवशाली इतिहासाचा जागर होणार; धुळे येथील जयपालसिंह गिरासे यांचे जाहीर व्याख्यान
May 8, 2023, 09:37 IST
अंचरवाडी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून अंचरवाडी येथील हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण आज, ८ मार्चच्या सायंकाळी होणार आहे. त्यानंतर धुळे येथील व्याख्याते जयपालसिंह गिरासे यांचे व्याख्यान होणार आहे.
राजपुतांच्या गौरवशाली इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून जयपालसिंह गिरासे यांची ओळख आहे. "हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची गौरवगाथा" या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. उद्या, ९ मे रोजी पारंपरिक पोशाखात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा शोभायात्रेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अंचरवाडी येथील हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.